पंतप्रधान मोदी आज शिर्डीत, भाषणाला मराठीतून केली सुरुवात !

पंतप्रधान मोदी आज शिर्डीत, भाषणाला मराठीतून केली सुरुवात !

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत दाखल झाले आहेत. शिर्डीमध्ये साईबाबांच्या शताब्दी महोत्सवाची सांगता पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. गेले 3 दिवस शिर्डीमध्ये साईबाबांचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. आज या महोत्सवाची सांगत झाली आहे. मंदिर भेटी नंतर जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून सुरुवात केली आहे. साईबाबांचं स्मरण केलं की माझ्या जनसेवा समर्पण भावनेला ऊर्जा मिळते असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे. सबका मलिक एक है या साईबाबांच्या सूत्रांनं समाज बांधला गेला असल्याचंही यावेळी मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-गृहप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी राज्यातील लाभार्थ्यांना घरं वाटप करण्यात आली आहेत. घरकुल योजना ही गरिबांसाठी कल्याणकारी योजना असून महाराष्ट्र सरकारचं कार्य उल्लेखनीय असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसेच राज्यातील अडीच लाख गरजूंना घरं वाटप करण्याचा मला मनापासून आनंद होत असल्याचंही मोदींनी म्हटलं आहे. हे घर तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं स्वप्न पूर्ण करण्याचं पहिलं पाऊल असून 2022 पर्यंत देशातील प्रत्येक बेघराला घर देणार असल्याचं अश्वासनही यावेळी मोदींनी दिलं आहे.

COMMENTS