मोदींचा मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला 4 मंत्रीपदे, 3 राज्यमंत्रीपदे, ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ !

मोदींचा मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला 4 मंत्रीपदे, 3 राज्यमंत्रीपदे, ‘या’ नेत्यांनी घेतली शपथ !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा आज पार पडला. या मंत्रीमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रीपदे आणि तीन राज्यमंत्रीपदे देण्यात आली आहेत. यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला एक केंद्रीय मंत्रीपद आले आहे. तर अकोल्यातील भाजपचे खासदार संजय धोत्रे यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. त्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. केंद्रीय मंत्रीपदी नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, डॉ. अरविंद सावंत, तर राज्यमंत्रीपदी रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे, यांची वर्णी लागली आहे.

दरम्यान पुढील सहा महिन्यांत महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणूका होणार आहेत. त्याधर्तीवर मोदी सरकारमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मंत्रीपदे मिळतील अशी आशा होती. मात्र, २०१४ च्या तुलतेन महाराष्ट्राला कमी मंत्रीपदे देण्यात आली असल्याचं दिसत आहेत.

2014 मध्ये दहा मराठी चेहऱ्यांना मंत्रीपद देण्यात आले होते. यामध्ये नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, अनंत गीते, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, डॉ. सुभाष भामरे, रावसाहेब दानवे, हंसराज अहीर, रामदास आठवले यांचा समावेश होता. पण शपथविधीनंतर काही दिवसांमध्येच गोपीनाथ मुंडेंचे निधन झाले. तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर २०१५ मध्ये रावसाहेब दानवे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील आठ चेहरे मोदी यांच्या मंत्रीमंडळात सहभागी होते.परंतु यावेळेस मात्र केवळ राज्यातील सात नेत्यांना मंत्रीपद देण्यात आलं आहे.

COMMENTS