हाथरस येथे राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीवर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया! पाहा

हाथरस येथे राहुल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीवर राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया! पाहा

मुंबई – उत्तर प्रदेशातील हाथरस येथे सामूहिक बलात्काराची शिकार झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी गेले होते. यावेळी यूपी पोलिसांकडून राहुल गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. दिल्लीतून हाथरसकडे रवाना झालेल्या प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांना ‘यमुना एक्स्प्रेस वे’वर अडवण्यात आल्यावर त्यांनी थेट गाडीतून उतरून पायी चालत हाथरसकडे रवाना होण्याचा निर्णय घेतला. मात्र, दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्यामुळे देशभरात संतप्त कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे. राहुल गांधीना धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसाच्या निलंबनाची मागणी करण्यात येत आहे. राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे.
केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारकडून लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम केलं जात असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. तर बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांनी देखील या घटनेचा निषेध केला आहे.

 

 

COMMENTS