अजित पवारांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल!

अजित पवारांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल!

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या घोटाळ्याप्रकरणी अजित पवार, विजयसिंह मोहिते-पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजीराव नलावडे यांच्यासह अनेक नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याचिका दाखल होऊनही गुन्हे न दाखल केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, शिखर बँकेच्या 46 संचालकांसह 34 जिल्हा बँकाच्या संचालकांचा यात समावेश आहे.

दरम्यान तब्बल २५ हजार कोटींचा हा घोटाळा असून सुरिंदर अरोरा यांनी याबाबत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या निर्देशांनुसार या नेत्यांवर गुन्हा करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले होते. कोर्टाने 75 लोकांबाबतीत निकाल दिला आहे. त्या बँकेच्या एकाही लोन कमेटीला आणि एक्झिक्युटिव्ह कमेटीला मी हजर नव्हतो. 75 लोकांपैकी भाजपचे हयात नसलेले मंत्री भाऊसाहेब फुंडकर देखील होते. शिवसेनेचे केंद्रातील माजी अर्थमंत्री यांचाही त्यात समावेश आहे. पण मीडिया मात्र फक्त अजित पवार अजित पवार करत आहे. काय माझ्याबद्दल त्यांना एवढे प्रेम आहे. या बँक प्रकरणात मी एक रुपयात सुध्दा मिंधा नसल्याचं म्हणत अजित पवारांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते.

COMMENTS