धनंजय मुंडें प्रकरणाबाबत पोलिसांकडे शरद पवारांची मागणी

धनंजय मुंडें प्रकरणाबाबत पोलिसांकडे शरद पवारांची मागणी

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर महिलेने केलेली तक्रारीचे स्वरुप गंभीर स्वरुपाचे आहे. या प्रकरणावर पोलीस विभाग चौकशी करत आहेत. या बाबतीत आम्ही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. चौकशी करताना एखादी एसीपी लेव्हलची महिला अधिकारी त्यात असावी असं मला वाटतं. या महिलेने मुंडेंसह इतरांची माहिती घेऊन वस्तुस्थिती पुढे आणावी आणि हे याबाबतीत सत्य समोर आणावं, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, काल मी या प्रकरणावर बोललो तेव्हा संपूर्ण चित्रं माझ्यासमोर नव्हतं. एखाद्या भगिनीने तक्रार केल्यावर तिची दखल घेतली. त्यामुळे गंभीर हा शब्द वापरला. आता सर्व चौकशी करावी आणि कुणावरही अन्याय होऊ नये असं वाटतं
मुंडे यांचा राजीनामाचा घ्यावा किंवा नाही. यावर मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्या महिलेच्या बाबतीत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाही तर कुणावरही आरोप करायचे आणि त्या व्यक्तीला सत्तेपासून दूर करायचं अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे या घटनेतील सत्य समोर यायला व्हावं

गुन्हा दाखल करण्याचं काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी या प्रकरणात खोलात जाऊन तपास करावा. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. या आरोपामधील सत्य बाहेर आल्यावर निर्णय घेता येईल. आरोप झाल्यावर संयम ठेवावा लागतो. सत्यता बाहेर येईपर्यंत थांबावं लागेल.

COMMENTS