पोलिसाचीच निर्घृन हत्या, पोलिसांची हत्या होत असेल तर सामान्यांच्या सुरक्षेचं काय ? पहा व्हिडिओ हत्येचा थरार !

पोलिसाचीच निर्घृन हत्या, पोलिसांची हत्या होत असेल तर सामान्यांच्या सुरक्षेचं काय ? पहा व्हिडिओ हत्येचा थरार !

सांगली – सांगलीत मंगळवारी रात्री पोलीस शिपाई समाधान मानटे (वय ३०) यांचा धारदार हत्याराने १८ वार करून अमानुष खून करण्यात आल्याच्या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. सांगलीतील हॉटेल रत्ना मध्ये मंगळवारी रात्री सव्वाबारा वाजता ही घटना घडली. ही घटना हॉटेलमधील सिसिटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सीसीटीव्हीतील फुटेज पाहून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र एका पोलिसाचीच गुंडांनी हत्या केल्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सांगलीमध्ये निवडणुकची धामधूम सुरू असताना ही हत्या झाल्याने सामान्य नागरिकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.

समाधान मानटे मूळचे बीड जिल्‍ह्‍यातील आहेत. सांगली जिल्हा पोलीस दलात ते २०१३ मध्ये भरती झाले आहेत. मिरज शहर पोलीस ठाण्यात ते रुजू होते. त्यांच्याकडे वाहतूक कारवाईची जबाबदारी होती. ते विश्रामबाग पोलीस वसाहतीमध्ये पत्नीसह राहत होते. मंगळवारी रात्री काम संपवून घरी येत असताना ते रत्ना हॉटेलमध्ये  गेले होते. काउंटरवर दोघा ग्राहकांशी त्‍यांचा वाद झाला. त्यानंतर ते हॉटेल व्यवस्थापकाशी हॉटेलच्या आवारातच बोलत थांबले. तेवढ्यात वाद झालेले ग्राहक हॉटेलबाहेर निघून गेले. यातील एकजण गाडीतील धारदार हत्यार घेऊन आला. त्याने मानटे यांच्यावर सपासप १८ वार केले. यामध्ये मानटे रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मरण पावले.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, गुंडविरोधी पथक, संजयनगर, विश्रामबाग, सांगली शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मृत मानटे गणवेशात होते. मानटे यांच्या खुनाची घटना हॉटेलमधील ‘सीसीटीव्ही’ कॅमेरात कैद झाली आहे. पोलिसांनी त्याचे फुटेज ताब्यात घेतले असून, त्याआधारे पोलिसांनी पुढील सुरू केला आहे. हॉटेलच्या व्यवस्थापकसह चार कामगारांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्येचे आरोपी शोधण्याचं मोठं आव्हान सांगली पोलिसांसमोर आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसात राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघणा-या घटना घडत आहेत. धुळ्यामध्ये संशयावरुन पाच जणांची जमावाने अत्यंत अमानूष पद्धतीने हत्या केली होती. ज्या शहरातचं प्रतिनिधीत्व मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री करतात ते नागपूर तर गुन्ह्यांची राजधानी झाल्यासारखी स्थिती आहे. नागपुरात सातत्याने हत्यांचं सत्र सुरू आहे. राज्यातही अनेक ठिकाणी अशी स्थिती आहे. मुख्यमंत्री फडणवीस मात्र आकडेवारी देऊन राज्यातली गुन्हेगारी कशी कमी झाली आहे असा दावा करुन स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत. आता तर ज्यांच्यावर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्या पोलीसाची गुंड हत्या करु लागत असतील तर त्यांचा आत्मविश्वास किती वाढला आहे. त्यांच्यात भीतीच राहीली नसल्याचं स्पष्ट होतंय. सामान्य नागरिकांची सुरक्षा तर वा-यावरच आहे असंच म्हणावं लागेल. आता तर मुख्यमंत्री याची दखल घेतील का ? आणि राज्यातल्या गुन्हेगारीवर वचक ठेवतील का ?  ते पहावं लागेल.

COMMENTS