राजस्थानमध्ये काँग्रेसमधील नाराजीनाट्य सुरुच, सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी !

राजस्थानमध्ये काँग्रेसमधील नाराजीनाट्य सुरुच, सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी !

राजस्थान – बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर मंत्र्यांचीही हकालपट्टी करण्यात आली. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयाची घोषणा केली. तसेच काँग्रसेच्या पक्षांतर्गत नव्या नियुक्त्यांचीही माहिती दिली.
त्यामुळे काँग्रेसमधील नाराजीनाट्य आणि राजकीय संकट सुरुच असल्याचं दिसत आहे.

दरम्यान मध्य प्रदेशातील ऑपरेशन लोटसनंतर भाजप राजस्थानमध्येही तसं करणार असल्याची चर्चा आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी असलेल्या मैत्रीमुळे सचिन पायलटही भाजपमध्ये जातील अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी भाजपनं काँग्रेसच्या काही आमदारांना फोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे आरोप काँग्रेसने केले होते.
त्यानंतर आता काँग्रेसच्या या भूमिकेमुळे पायलट भाजपमध्ये जातील असं बोललं जात आहे.

COMMENTS