निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ सहा पक्षांना दिलं ‘हे’ चिन्ह!

निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीसाठी ‘या’ सहा पक्षांना दिलं ‘हे’ चिन्ह!

मुंबई – आगामी विधानसभा निडणूक लढण्यासाठी सज्ज झालेल्या सहा पक्षांसाठी निवडणूक आयोगानं चिन्ह जाहीर केलं आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर, संभाजी ब्रिगेड पार्टीला शिलाई मशीन,
महाराष्ट्र क्रांती सेनेला हिरा, हम भारतीय पार्टीला, ऊस घेतलेला शेतकरी, टिपू सुलतान पार्टीला किटली तर भारतीय जनसम्राट पार्टीला टेलिफोन हे चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये कप-बशी या चिन्हावर राज्यात तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवणारी वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे या चिन्हावर वंचित बहुजन आघाडी राज्यातील वातावरण तापवणार का हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान वंचित बहूजन आघाडीचे कायमस्वरुपी चिन्ह मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. परंतु त्यासाठी निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढवण गरजेचं आहे. त्यामुळे यावेळच्या विधानसभा निवडणुकीत अधिक मतांची टक्केवारी घेऊन निवडणूक आयोगाच्या पात्रतेत आम्ही नक्की बसू, असा विश्वास प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS