गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदल होणार, मुख्यमंत्री पर्रिकर पुन्हा अमेरिकेला !

गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदल होणार, मुख्यमंत्री पर्रिकर पुन्हा अमेरिकेला !

पणजी – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हे पुन्हा उपचार घेण्यासाठी अमेरिकेला जाणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ते अमेरिकेला उपचार करण्यासाठी गेले होते. परंतु अमेरिकेहून परतल्यानंतर पुन्हा त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे ते पुन्हा अमेरिकेला जाणार आहेत. पर्रिकरांच्या या आजारपणामुळे गोव्यातील प्रशासन व्यवस्था कोडमलत चालली आहे. त्यामुळे गोव्याच्या नेतृत्वात बदल करण्यासाठी आता हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह भाजपची कोअर टीम अमित शहा यांची भेट घेणार आहे.

दरम्यान गोवा सरकारमधील सगळेच मंत्री सध्या अस्वस्थ असून सरकारमधील दोन मंत्री आजारी आहेत. ते कधी बरे होऊन परत येतील हे ठाऊक नाही. तसेच विद्यमान सरकारमध्ये भाजपाकडे फक्त 14 आमदार असून त्यापैकी तिघे गंभीर आजारी आहेत. गोवा फॉरवर्ड, मगोप आणि तिघे अपक्ष यांच्याच आधारावर विद्यमान सरकार टिकून आहे.  मुख्यमंत्री वारंवार आजारी होऊ लागल्याने व त्यांचे अनेक दिवस इस्पितळांमध्ये उपचारांसाठीच जाऊ लागल्याने गोव्यातील भाजपही चिंताग्रस्त बनला आहे. त्यामुळे नेतृत्वाबाबत पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आता भाजपकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे याबाबत आता अमित शाह हे काय निर्णय घेतली याकडे लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS