राजकीय नेत्यांच्या घरी अवतरले बाप्पा, पाहा व्हिडीओ!

राजकीय नेत्यांच्या घरी अवतरले बाप्पा, पाहा व्हिडीओ!

मुंबई – राज्यातील राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी आज दुपारी बाप्पाचं आगमन झालं. मुख्यमंत्री ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे उपस्थित होते.

तसेच मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील घरी गणरायाचे आगमन झाले. यावेळी त्यांनी राज्यावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे, असं साकडं घातलं. तसेच भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील घरी गणरायाचे आगमन झाले. यावेळी सहपत्नीक त्यांनी आरती केली.भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, भोसरीतील आमदार महेश लांडगे यांच्या घरीही गणरायाचे आगमन झाले.

 

COMMENTS