मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत महत्त्वाची बातमी!

मंत्रिमंडळातील खातेवाटपाबाबत महत्त्वाची बातमी!

मुंबई – राज्यात सरकार स्थापनेच्या सर्व प्रक्रिया आणि आवश्यक नियुक्त्या पार पडल्यानंतर आता येत्या दोन दिवसांत मंत्र्यांचे खातेवाटप करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली होती. त्यामुळे आज खातेवाटप होईल अशी चर्चा होती. परंतु खातेवाटप आजही लांबणीवर जाणार असल्याची शक्यता आहे. कारण खाते वाटपाची चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते दिल्लीत आहेत.

तसेच महाराष्ट्र विकास आघाडीत कोणती खाती कोणत्या पक्षाला याबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. काही खात्यांवरून अजूनही तीन पक्षात मतभेद आहेत. याबाबत सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करुन काँग्रेस नेते आज संध्याकाळी मुंबईत परत येण्याची शक्यता आहे. त्यानंतर तीनही पक्षांची बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजही खातेवाटपाची शक्यता कमी आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या शपथविधीवेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या जयंत पाटील, छगन भुजबळ, शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, सुभाष देसाई तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात आणि नीतीन राऊत या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सातही मंत्री सध्या सरकारचा कारभार चालवत आहेत.

 

COMMENTS