ठाणे तुरुंगात कैद्याला मानवी विष्ठा खायला दिली, मानवाधिकार आयोगानं घेतली दखल !

ठाणे तुरुंगात कैद्याला मानवी विष्ठा खायला दिली, मानवाधिकार आयोगानं घेतली दखल !

मुंबई – ठाणे तुरुंगात धक्कादायक प्रकार घडला असून एका कैदाला मानवी विष्ठा खायला दिली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या कैद्याची प्रकृती बिघडली असून याबाबत आमदार रमेश कदम यांनी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल मानवाधिकार आयोगाने घेतली असून जेल प्रशासनाला समन्स पाठवण्यात आले आहे.

दरम्यान ठाणे जेल प्रशासनावर आमदार रमेश कदम यांनी गंभीर आरोप केले असून कारागृह प्रशासनाच्या कर्मचा-यांनी एका कैद्याला जबर मारहाण करून मानवी विष्ठा खायला लावली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या प्रकरणानंतर त्या कैद्याची प्रकृती बिधडली असून २७ जुनला ही घटना घडली असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे. तसेच त्याठिकाणचं सीसीटीव्ही तपासण्याची मागणीही आमदार रमेश कदम यांनी केली आहे. या घटनेमुळे पन्हा एकदा मंजुला शेट्टे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS