तारिक अन्वर यांच्या राजीनाम्याबाबत प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया !

तारिक अन्वर यांच्या राजीनाम्याबाबत प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया !

नवी दिल्ली – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजीनामा देणं हे अन्वर यांची इच्छा आहे. परंतु त्यांनी ज्या मुद्द्यावर राजीनामा दिला तो चुकीचा असल्याचं पटेल यांनी म्हटलं आहे. तसेच अन्वर यांचा राजीनामा बेजबाबदारपणाचा असल्याचंही पटेल यांनी म्हटल आहे. प्रत्येक पक्षात कोण येतं तर कोण जातं. त्याचा अर्थ पक्ष संपत नसल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अन्वर यांनी शरद पवारांवर केलेले आरोप चुकीचे असून त्यांनी शरद पवारांना फोन करुन विचारायला हवं होतं. परंतु त्यांनी असं न करता अचानकपणे राजीनामा देणं हे चुकीचं असल्याचंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. तसेच याबाबत आम्ही तारिक अन्वर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करु असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.

COMMENTS