बिहार निवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी दिली महत्त्वाची माहिती! VIDEO

बिहार निवडणूक लढवण्याबाबत राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांनी दिली महत्त्वाची माहिती! VIDEO

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी प्रदेश कार्यालयात माध्यमांना दिली. काँग्रेस आणि राजदसोबत एकत्र निवडणूक लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली होती. बिहार काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, वरिष्ठ नेते अहमद पटेल, तसेच राजदचे तेजस्वी यादव यांच्याशी आपण याबाबत चर्चा केली होती. आम्ही जास्त जागांसाठी आग्रहीदेखील नव्हतो पण एकत्र लढण्याची काँग्रेसची मानसिकता दिसली नाही त्यामुळे आता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे असे प्रफुल पटेल म्हणाले.

एकत्र येऊन बीजेपी व जदयूचा मुकाबला केला पाहिजे असे एकीकडे म्हणतात मात्र दुसरीकडे इतर पक्षांना महत्त्व देत नाहीत, ही काँग्रेसची भूमिका दुर्दैवी असल्याची खंत पटेल यांनी यावेळी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

 

COMMENTS