नथुराम गोडसे देशभक्त, त्याला दहशतवादी ठरवणाऱ्यांना निवडणुकीत उत्तर दिलं जाईल -प्रज्ञासिंह ठाकूर

नथुराम गोडसे देशभक्त, त्याला दहशतवादी ठरवणाऱ्यांना निवडणुकीत उत्तर दिलं जाईल -प्रज्ञासिंह ठाकूर

नवी दिल्ली – भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. नथुराम गोडसे हा देशभक्त होता आहे आणि यापुढेही राहील असं वक्तव्य प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलं आहे.तसेच नथुरामला दहशतवादी ठरवणाऱ्या लोकांना या निवडणुकीत उत्तर दिलं जाईल असंही साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच अभिनेता कमल हासन याने नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्याचा साध्वी प्रज्ञा यांनी समाचार घेतला आणि जे लोक नथुरामला दहशतवादी समजतात त्यांना धडा शिकवला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.भोपाळमधून साध्वी प्रज्ञा या निवडणूक लढवत आहेत. एका कार्यक्रमादरम्यान त्ा बौलत होत्या.

COMMENTS