अकोल्यात सोमवारी ओबीसी मेळावा, ऍड. प्रकाश आंबेडकर काय बोलणार ?

अकोल्यात सोमवारी ओबीसी मेळावा, ऍड. प्रकाश आंबेडकर काय बोलणार ?

अकोला – ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत सोमवारी अकोला येथे ओबीसी मेळावा पार पडणार आहे. आगामी निवडणूक लक्षात घेता भारिप बहूजन महासंघाच्यावतीनं हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात बहूजन आणि मागासवर्गीयांना एकत्रित आणून भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांकडून केला जाणार आहे. तसेच विविध मुद्द्यांवरुन केंद्र आणि राज्य सरकारवर प्रकाश आंबेडकर हे तोफ डागणार असल्याचं दिसून येत आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारीप-बहूजन महासंघानंही सुरुवात केली असल्याचं दिसत आहे. या मेळव्यातून ओबीसी समाजाला एकत्रित आणून भाजपसह इतर पक्षांना जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न आंबेडकरांकडून सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणासह इतर मुद्द्यांवरुन प्रकाश आंबेडकर सरकारला धारेवर धरणार असल्याचं दिसून येत आहे.

 

COMMENTS