1 जानेवारीला भीमा कोरेगावला जाणारच, प्रकाश आंबेडकरांची आक्रमक भूमिका !

1 जानेवारीला भीमा कोरेगावला जाणारच, प्रकाश आंबेडकरांची आक्रमक भूमिका !

अहमदनगर – येत्या १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. कोणी आम्हाला रोखू शकत नसल्याचं वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. तसेच मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणामुळे ओबीसी समाजात अस्वस्थतता आहे. त्या अस्वस्थततेचे निवडणूक काळात पडसाद उमटू शकतात अशी भिती त्यांनी व्यक्त केली. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

दरम्या मागच्यावर्षी १ जानेवारी रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटांमध्ये झालेल्या संघर्षातून मोठा हिंसाचार झाला होता.त्यामुळे भीमा-कोरेगावची संवेदनशीलता लक्षात घेऊन कोणालाही भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ सभा घेण्याची परवानगी देणार नसल्याचं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी म्हटलं होतं. परंतु याबाबत प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आम्ही भीमा-कोरेगावला जाणारच असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS