प्रकाश आंबेडकरांनी मतदारसंघ बदलला, काँग्रेसची डोकेदुखी वाढली !

प्रकाश आंबेडकरांनी मतदारसंघ बदलला, काँग्रेसची डोकेदुखी वाढली !

अकोला – भारीप-बहुजन विकास आघाडीचे प्रमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपला मतदारसंघ बदलला आहे. अकोला मदारसंघा ऐवजी सोलापुरातुन निवडणूक लढवणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेवून केली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या घोषणेमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

दरम्यान विदर्भातील अकोला जिल्हा अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा बालेकिल्ला मानला जातो. किंबहुना, आतापर्यतं अॅड. प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारंसघातून लढणार, अशीच चर्चा होती. मात्र, अकोल्यातच पत्रकार परिषद घेऊन, प्रकाश आंबेडकरांनी आपण सोलापुरातून लढणार आहोत, अशी घोषणा केली. त्यामुळे  राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा बालेकिल्ला आहे. पण मागील लोकसभा निवडणुकीत भाजपचे शरद बनसोडे हे जाएंट किलर ठरले. आधीच भाजपचं आव्हान आणि त्यात आता प्रकाश आंबेडकर यांची एंट्री यामुळे सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या मतदारसंघात मराठा, धनगर समाजाप्रमाणेच मुस्लीम आणि दलित मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघात चांगली कामगिरी करू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेसची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.

COMMENTS