काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मनी – प्रकाश आंबेडकर

काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मनी – प्रकाश आंबेडकर

अमरावती – भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस आणि भाजप एकाच माळेचे मनी असून भाजप हार्ड तर काँग्रेस सॉफ्ट हिंदुत्ववादी असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही काँग्रेससोबत हातमिळवणी करण्यास इच्छुक होतो. परंतु जर काँग्रेसला गरज नसेल तर आम्ही काय करू शकतो हे त्यांना दाखवून देऊ असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारिप बहूजन महासंघ काँग्रेससोबत जाणार नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान काँग्रेससोबत युती न झाल्यास आम्ही समविचारी पक्षांना सोबत घेऊन राज्यात तिसरा पर्याय देऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. काँग्रेससोबत आघाडीबाबतची चर्चा आहे तिथेच असून ती पुढे गेली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आमच्यासोबत यायचं असेल तर एमआयएम पक्षाला दूर ठेवावं लागेल अशी भूमिका काँग्रेस – राष्ट्रवादीने घेतली आहे.परंतु काहीही झालं तरी एमआयएमचा हात सोडणार नसल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते अमरावतीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

COMMENTS