आपण नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलोय, मंदिरं खुली करण्याच्या मागणीवरुन प्रकाश आंबेडकर आक्रमक!

आपण नियम मोडण्यासाठीच पंढरपुरात आलोय, मंदिरं खुली करण्याच्या मागणीवरुन प्रकाश आंबेडकर आक्रमक!

मुंबई – राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीवरुन प्रकाश आंबेडकर आक्रमक झाले आहेत. याबाबत त्यांनी पंढरपुरात आक्रमक भूमिका घेतली आहे. आंदोलनामुळे मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते जमले आहेत. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे. याबाबत विचारले असता आपण नियम मोडण्यासाठीच इथे आलो असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दारू, दुकान, एसटी हे सुरू करण्यात आलं आहे. मग मंदिरं बंद का असा सवाल त्यांनी विचारला आहे. लोकांच्या भावना असलेली धार्मिक स्थळ सुरू करावी. सरकारने अंत पाहू नये, आजची परिस्थिती बघून सरकार लवकर निर्णय घेईल असं वाटतं.
परंतु सरकारकडून अजून कोणीही माझ्याशी बोललेलं नाही.माझ्या प्रत्येक आंदोलनाला यशच आलं आहे. त्यामुळे मंदिर लवकरच खुली होतील, दुसरं काही करायची गरज पडणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांच्या या आंदोलनावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मंदिर बंद ठेवणं हे कोणी आनंदाने करत नाहीयेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकार हे टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी उघड्या करत आहेत. भविष्यात लवकरच मंदिराचा विषय, रेल्वे सुरु करण्याबाबत चर्चा आहे. पण विरोधी पक्षाने सुद्धा महाराष्ट्राच्या हितासाठी थोडा संयम बाळगला तर महाराष्ट्राच्या जनतेवर उपकार होतील. आज ज्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांनी ज्याप्रकारे गर्दी जमवली आहे. ती रेटारेटी सुरु आहे. हे चित्र चांगलं नाही. पंढरपुरच्या विठोबाच्या दर्शनाला संपूर्ण महाराष्ट्र आसुसलेला आहे. फक्त बाहेर आंदोलक आहेत ते नाहीत असं राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS