प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केला वंचित बहूजन आघाडीचा आणखी एक उमेदवार!

प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केला वंचित बहूजन आघाडीचा आणखी एक उमेदवार!

अकोला – भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वंचित बहूजन आघाडीचा पाचवा उमेदवार जाहीर केला आहे. अमरावतीत झालेल्या सभेत गुणवंत देवपारे यांच्या नावाची घोषणा त्यांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पाचवा उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेस आणि आंबेडकर ह्यांची आघाडीची घडी बसणार नसल्याचं चित्र दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वीच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. परंतु त्यानंतरही प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या वंचित बहूजन आघाडीचा पाचवा उमेदवार जाहीर केला आहे.

दरम्यान आतापर्यंत बुलडाण्यातून आमदार बळीराम सिरस्कार, नांदेडमधून प्रा. यशपाल भिंगे, यवतमाळमधून प्रा. प्रविण पवार, माढ्यातून अॅड. विजय मोरे यांची नावे लोकसभेसाठी जाहीर केली आहेत.  अॅड. प्रकाश आंबेडकर असेच उमेदवार जाहीर करत राहिले तर आघाडीचा गुंता कसा सुटणार का? असा सवाल केला जात आहे.

COMMENTS