प्रकाश आंबेडकरही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात !

प्रकाश आंबेडकरही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात !

नागपूर – भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. मी लोकसभा निवडणूक लढणार हे नक्की आहे. मात्र लक्ष्मण माने यांनी सहीच करणार नाही, असं म्हटल्यामुळे मला आधी तो तिढा सोडवायचा आहे. लक्ष्मण माने यांनी सुशीलकुमार शिंदेंचं ब्लड प्रेशर वाढवायचं ठरवलं आहे, तसेच आता मला नागपूरबाबत विचारत आहात, गडकरींचं ब्लड प्रेशर वाढवायचं कोणी ठरवलं माहिती नाही असा टोलाही यावेळ आंबेडकर यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी महाआघाडीत सामील होण्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस संघाला संविधानिक चौकटीत आणण्याचा आराखडा देत नसून तिथे चर्चा अडकली आहे. काँग्रेस युतीसाठी उत्सुक आहे, असं मी मानत नाही. त्यामुळे ते हा आराखडा देतील असं वाटत नाही. तसेच आम्ही 48 उमेदवार उभे करु शकतो असंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

COMMENTS