प्रकाश आंबेडकरांनी घेतली छगन भुजबळांची भेट, आघाडीत सहभागी होणार?

प्रकाश आंबेडकरांनी घेतली छगन भुजबळांची भेट, आघाडीत सहभागी होणार?

मुंबई – भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची भेट घेतली. भुजबळ यांच्या वांद्रे येथील एमईटी संस्थेच्या कार्यालयात ही भेट पार पडली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत सहभागी होण्याची इच्छा आंबेडकरांनी अनेकदा व्यक्त केली आहे. मात्र आपल्याला काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नसल्याचा आंबेडकरांचा आरोप आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांची आजची भेट ही आघाडीतील समावेशाबाबत चर्चा करण्यासाठी असल्याचे समजते.

दरम्यान आंबेडकरांनी काँग्रेसकडे आघाडीत 12 जागांची मागणी केली आहे. मात्र काँग्रेस त्यांना अमरावतीची जागा द्यायला तयार आहे. त्यामुळे ही चर्चा पुढे जाऊ शकलेली नाही. दुसरीकडे आंबेडकर वारंवार शरद पवारांवर आणि राष्ट्रवादी पक्षावर टीका करत असतात. आजच्या भुजबळ भेटीनिमित्त आंबेडकर पवार आणि राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत का अशी चर्चा आहे. तसेच या भेटीनंतर आंबेडकर आघाडीत सहभागी होणार का हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS