महाराष्ट्रानंतर वंचित बहूजन आघाडी आता बिहारमध्ये,  विधानसभेची निवडणूक लढवण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय!

महाराष्ट्रानंतर वंचित बहूजन आघाडी आता बिहारमध्ये, विधानसभेची निवडणूक लढवण्याचा प्रकाश आंबेडकरांचा निर्णय!

मुंबई – महाराष्ट्रानंतर वंचित बहुजन आघाडीने आता उत्तरेकडे मोर्चा वळवला आहे. वंचित बहूजन आघाडीने बिहार विधानसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून ही निवडणूक स्वबळावर न लढवता समविचारी पक्षांशी आघाडी करून लढण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. बिहारमध्ये मात्र त्यांनी आघाडीचं राजकारण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बिहारमधील लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि मायावतींचा बहुजन समाज पक्ष त्यांना कसा प्रतिसाद देतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.

बिहारमध्ये होणाऱ्या निवडणुका देशाच्या राजकीय भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून
सर्वांनी मिळून जर बिहारमधील एनडीएचं सरकार पाडलं तर केंद्रातील मोदी सरकारही पाडलं जाऊ शकतं.त्यामुळेच आम्ही समविचारी पक्षांशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला असल्याचं आंबेडकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितमुळे दोन्ही काँग्रेसला जोरदार फटका बसला होता. त्यानंतर आता आंबेडकरांनी आपला मोर्चा बिहारकडे वळवला आहे.

COMMENTS