…तर काँग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकर यांनी केलं स्पष्ट!

…तर काँग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकर यांनी केलं स्पष्ट!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत जाण्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही काँग्रेसला 40 जागांची ऑफर दिली आहे. ती स्वीकारली तरच काँग्रेससोबत जाऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे.आम्ही आधीच आमची भूमिका जाहीर केली आहे. काँग्रेस काही भागात तुल्यबळ नाही. माझी असदुद्दीन ओवेसींसोबत बैठक झाली. आमची आघाडी पुढे कायम ठेवण्याचं आमचं ठरलं आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी निवडणुका बॅलेट पेपरवरच घ्याव्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे. निवडणूक आयोग, मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट यांनी ईव्हीएम हॅक होणार नाही असा दावा केला. हायकोर्टाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठत EVM विरोधात 31 याचिका दाखल आहेत.  कोर्टाने निवडणूक आयोगाला मतदानाच्या आकडेवारीत फरक कसा झाला याबाबत विचारणा करावी, असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS