काँग्रेसला एवढ्या जागांची ऑफर,  ३१ ऑगस्टपर्यंत वाट पाहणार – प्रकाश आंबेडकर

काँग्रेसला एवढ्या जागांची ऑफर, ३१ ऑगस्टपर्यंत वाट पाहणार – प्रकाश आंबेडकर

मुंबई – वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला अल्टीमेटम दिला आहे. काँग्रेसला १४४ जागांची ऑफर दिली असून ३१ ऑगस्टपर्यंत वाट पाहणार त्यानंतर आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच एमआयएमसोबत लोकसभेला युती होती ती विधानसभेलाही कायम राहणार असल्याचं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे.

दरम्यान ज्या यपद्धतीने इडीच्या चौकशी सुरू आहेत, त्याला राजकीय वास आहे. विरोधक संपवण्याचा हा डाव आहे. विरोधी पक्षांना जसं घाबरवल जातंय तसं त्यांच्या पक्षातल्या लोकांना ही घाबरवलं जात आहे. विरोधी पक्ष संपवायचे राजकारण सुरु आहे. नुसतं विरोधी पक्ष नाहीं तर पक्षातील विरोधकांना पण संपवायचे प्रयत्न सुरू आहेत. चंद्रकांत पाटील एक उदाहरण आहेत. उद्धव ठाकरे यांना विचारा ते का बोलत नाहीत.
ब्लॅकमेलिंगची भीती आहे सगळ्यांना असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

तसेच ओबीसी समाजाला पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे. एससी, एसटीच्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप दुप्पट झाली पाहिजे. अधिकारी वर्गातला एक वर्ग बीजेपी आरएसएससोबत असल्याचंही आंंबेडकर यांनी म्हटलं आहे.

2 जी घोटाळ्यातील आरोपी भाजपच्या काळात सुटले त्यामुळे वास येतोय की अधिकाऱ्यांमधील एक वर्ग संघाच्या मानसिकतेचा आहे. त्यांनी 2जी सारखे घोटाळ्याचे कुंभाड रचले का? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसेच राज्य सहकारी बँकेतील घोटाळा फडणवीस यांना आव्हान करतो. अहवाल त्यांनी पब्लिश करावा नाहीतर डोंगर पोखरून उंदीर निघाला असं होऊ नये. असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS