प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, लोकसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर !

प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा, लोकसभा निवडणुकीसाठी पहिला उमेदवार जाहीर !

शेगाव – भारिप बहूजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज मोठी घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा आंबेडकर यांनी केली आहे. बुलडाणा लोकसभा निवडणुकीसाठी बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळीराम शिरस्कार यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी शेगांव येथील वंचित माळी समाजाच्या राजकीय एल्गार परिषदेत केली आहे.

दरम्यान बुलडाणा लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव हे आमदार आहेत. आमदार बळीराम सिरस्कार हे माळी समाजाचे आहेत. माळीकार्ड सोबतच एमआयएम, भारिपची व्होट बँक ही वंचित आघाडीची जमेची बाजू असल्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. परंतु अशातच प्रकास आंबेडकर यांनी ही घोषणा केल्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आघाडीत जाणार नसल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS