प्रकाश आंबेडकर म्हणतात मीच राजा, आठवले म्हणजे कागदी वाघ !

प्रकाश आंबेडकर म्हणतात मीच राजा, आठवले म्हणजे कागदी वाघ !

कोल्हापूर – प्रसारमाध्यमांनी उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकणार नाहीत. मी कालही राजा होतो, आजही राजा आहे आणि उद्याही राजा राहणार असं वक्तव्य भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना उद्देशून त्यांनी हे वक्तव्य केलं असून रामदास आठवले यांची समाजाशी असलेली नाळ आता तुटली आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे.

दरम्यान यावेळी बोलत असताना त्यांनी रामदास आठवले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तुम्ही उभे केलेले कागदी वाघ माझ्यासमोर उभे राहू शकत नाहीत. त्यामुळे तुम्ही त्यांना स्वत:पर्यंत मर्यादित ठेवावे, असे सांगत आंबेडकर यांनी रामदास आठवलेंवर निशाणा साधला आहे. तसेच त्यावेळी दलित समाजाचा नेता म्हणून आठवलेंना मोठे करण्यात प्रसारमाध्यमांचा वाटा असल्याचे आंबेडकरांनी अधोरेखित करायचा प्रयत्न केला.

COMMENTS