भिडेंना अटक करा नाहीतर मेलेली भुते बोलू लागतील, प्रकाश आंबेडकरांचा इशारा !

भिडेंना अटक करा नाहीतर मेलेली भुते बोलू लागतील, प्रकाश आंबेडकरांचा इशारा !

मुंबई –  संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी संभाजी भिडेंना अटक करा नाहीतर मेलेली भुते बोलू लागतील असा इशारा सरकारला दिला आहे. 1 तारखेची दंगल झाल्यानंतर आता तीन महिने पूर्ण होतील आणि अजूनही सरकार म्हणतय की आमच्याकडे पुरावा नाही हे पोलीस खात आपल्या मुख्यमंत्र्याला वाचवू शकत नाही, रखवालदाराकडून रखवाली काढून घेण्याची वेळ आली असल्याचंही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान जाता जाता सांगतो आमच्या नादाला लागू नका, मोदींना वाटत असेल शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ट्विटर, फेसबुकवर स्वतःच्या फोटोसह भिडेंचा फोटो टाकायचा आणि दाखवायचं की भिडे किती जवळचे आहेत. तसेच मोदी मुख्यमंत्री असतांना त्यांनी काय काय केलंय हे आम्हाला माहिती असल्याचा इशाराही आंबेडकर यांनी दिला आहे. 1 तारखेला आम्ही पूर्वजांना मानवंदना करायला गेलो होतो परंतु सनातनी आम्हाला यावेळी मारत असतील आणि सरकार त्यांना पाठीशी घालत असेल तर ही यादवी आहे. त्यामुळे लोकांमधला हा उद्रेक लक्षात घ्या. भिडे तुमचा गुरू असेल त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही तो दंगलखोर आहे त्याला अटक व्हावी हीच आमची मागणी असल्याचंही ते म्हणाले आहेत. बीजेपी, आरएसएस तुम्ही लक्षात घ्या की अजून राजेशाही आली नाही लोकशाही आहे. मोदीला हटवायचा निर्णय ठाम असून  हिटलरला सुद्धा स्वतःला गोळ्या घालाव्या लागल्या कारण तो कोणाचं ऐकत नव्हता  मोदी सुद्धा स्वतःची मनमानी चालवत आहेत. त्यामुळे मोदींना सांगतो आम्ही तुझे कैदी होणार नाही तुला कैदी करणार.

तसेच मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच मंत्रिमंडळातील हरेन पंड्याचा खून झाला.त्यामुळे मोदींनी आरोपीला पकडण्याच्या आड येऊ नये, अन्यथा मसणातून त्यांना पकडू असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच आज आलोय इशारा द्यायला पुढच्या वेळी फक्त माझी दादागिरी चालेल हे पोलिसांना सांगतोय भिडेला अटक झाली नाही तर विधान भावनाला घेराव घालणार-प्रकाश आंबेडकर

COMMENTS