त्यामुळेच माढा मतदारसंघातून पवारांनी माघार घेतली – प्रकाश आंबेडकर

त्यामुळेच माढा मतदारसंघातून पवारांनी माघार घेतली – प्रकाश आंबेडकर

मुंबई – माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड प्रकाश आंबेडकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजातील लोकप्रिय नेते विजय मोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्याचा धसका पवारांनी घेतला असून त्यांनी आता निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. याबाबत आज त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. एकाच घरातील तीन मी स्वतः उभं न राहता पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे निवडणूक लढवतील. नव्या पिढीला संधी द्यावी हा माझा मानस आहे. एका निवडणुकीला एकाच कुटुंबातील किती लोकांनी उभं रहावं याला काही मर्यादा असाव्यात असं मला वाटतं त्यामुळे मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

परंतु माढा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने मोठी ताकद निर्माण केली आहे. याचा धसका शरद पवार यांनी घेतला असावा. म्हणूनच त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली’ असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS