राज ठाकरे माझी कॉपी करतायत -प्रकाश आंबेडकर

राज ठाकरे माझी कॉपी करतायत -प्रकाश आंबेडकर

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत, त्यांना डोकं नाही,  अशी बोचरी टीका भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.राज ठाकरे यांनी तीन दिवसांपूर्वी विक्रोळीतील सभेत भाजपावर गंभीर आरोप केला होता. ओवेसींच्या मदतीने देशात राम मंदिराच्या मुद्द्यावरुन दंगली घडवण्याचा डाव असून याबाबत माहिती देणारा फोन आपल्याला दिल्लीवरुन आल्याचा दावा त्यांनी केला होता. याबाबत प्रकाश आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, मी हा मुद्दा महिनाभरापूर्वीच मांडला होता. राज ठाकरेंना डोके नाही. ते माझीच कॉपी करत असून राम मंदिरावरुन दंगली घडवण्याचा कट असल्याचा दावा मी महिनाभरापूर्वीच केला होता, असं प्रकाश आंबेडकर  यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यातील भाजपा सरकारने मराठा समाजाची मते मिळवण्यासाठीच मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाची मते मिळाल्यास भाजपाच्या जागा १७० पर्यंत जातील, असे मुख्यमंत्र्यांना वाटत असावे. पण मी त्यांच्या आनंदात खडा टाकू इच्छित नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. मराठा समाजाला आरक्षण दिल्याने ओबीसी समाजात भीती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

COMMENTS