राज्यात नवी राजकीय आघाडी, विरोधकांच्या ऐक्याला धक्का !

राज्यात नवी राजकीय आघाडी, विरोधकांच्या ऐक्याला धक्का !

औरंगाबाद – राज्यात भाजप विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महाआघाडी स्थापन करण्याच्या निर्णय घेतला आहे. मात्र आघाडीच्या या मनसुब्यांना धक्का लागण्याची शक्यता आहे.  प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. येत्या 2 ऑक्टोबरला औरंगाबादमध्ये या दोन्ही पक्षांची एकत्र सभा होणार आहे. या सभेला प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असाउद्दीन ओवेसी हजर राहणार आहेत. या नव्या आघाडीचं नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुका दोन्ही पक्ष एकत्रित लढवणार आहेत.

2014 च्या निवडणुकीत एमआएमचा मोठा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. तसंच त्यांचे 2 आमदार निवडूण आले आहेत. तर अनेक ठिकाणी एमआयएम दुस-या क्रमांकवर होते. त्यावेळी त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वी बहुजन वंचित आघाडीच्या नावानं नवी आघाडी उभी केली आहे. दलित बहुजनांना एकत्र आणण्याचा प्रय़त्न त्यातून केला जात आहे. गेल्या पाच वर्षात एमआयएच्या लोकप्रियेतेमध्ये मोठी घसरण झाली होती. मात्र आता प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम एकत्र आल्यास त्यांना पुन्हा नवसंजिवनी मिळण्याची शक्यता आहे.

COMMENTS