माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर लोधी रोडजवळील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांनी मुखाग्नी दिला. प्रणव मुखर्जी यांचे पार्थिव आज सकाळी 9.30 दरम्यान राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान गाईडलाईन्स पालन केले गेले.यावेळी त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी तसेच इतर कुटुंबियांनी पीपीई किट घातला होता. दुपारी 2 वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेले.

दरम्यान प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना नवी दिल्लीतल्या लष्कराच्या आर अॅंड आर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर मेंदूची शस्त्रक्रिया झाली यानंतर त्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली असता ते कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं. प्रणव मुखर्जी यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांसह अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

COMMENTS