प्रशांत किशोर यांच्या घरवापसीनंतर 2019 मध्ये भाजपला यश मिळणार ?

प्रशांत किशोर यांच्या घरवापसीनंतर 2019 मध्ये भाजपला यश मिळणार ?

नवी दिल्ली – नियोजनकार प्रशात किशोर हे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या येण्यामुळे भाजपला यश मिळणार का असा देखील सवाल विचारला जात आहे. दरम्यान प्रशात किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या २०१२च्या गुजरात निवडणुकांमध्ये व २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्यानंतर ते भाजपाच्या विरोधकांच्या टीममध्ये बिहार व उत्तर प्रदेशमध्ये दाखल झाले आहेत. परंतु ते पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशांत किशोर यांच्या खुद्द मोदींसमवेत गेल्या काही दिवसांमध्ये दीर्घ बैठका झाल्या असून त्या २०१९च्या रणनितीचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसे असेल तर भाजपाचे नियोजनकार म्हणून किशोर यांची घरवापसी निश्चित मानली जात आहे. विशेष म्हणजे किशोर यांच्या भाजपा अध्यक्ष अमित शाह य़ांच्यासोबतही काही बैठका झाल्या असल्याची माहिती आहे. त्यामुळे शाह व किशोर यांच्यामधली दरी बुजली असून दोघेही पुन्हा २०१९च्या निवडणुकांसाठी एकत्र काम करण्याचे संकेत वर्तवले जात आहेत. तसेच आगामी निवडणुकीच्या दरम्यान तरूणांच्या पाठिंब्यावर जास्त भर द्या, तो प्रचाराचा फोकस ठेवा असा सल्ला किशोर यांनी दिला असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS