पेढा भरवत शिवसेनेच्या सरनाईकांनी भाजपच्या राम कदमांना दिली गोड बातमी!

पेढा भरवत शिवसेनेच्या सरनाईकांनी भाजपच्या राम कदमांना दिली गोड बातमी!

मुंबई – गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाला अखेर काहीअंशी पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सरकारने विधानसभेत आपलं बहुमत सिद्ध केलं आहे.महाराष्ट्र विकास आघाडीकडे 169 आमदारांचं संख्याबळ आहे. प्रस्तावाच्या बाजूने 169 आमदारांनी मतदान केलं. तर विरोधात 0 आमदारांनी मतदान केलं. यावेळी तटस्थ 4 आमदार राहिले. मनसे 1 आणि एमआयएम 2, माकप 1 या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली. त्यामुळे ठाकरे सरकार हे अग्निपरीक्षेत पास झाले आहे.

दरम्यान हा ठराव जिंकल्यामुळे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भाजप आमदार राम कदम यांना पेढा भरवत सरकार बहूमत सिद्ध केल्याची गोड बातमी दिली आहे. विधानसभा निकालानंतर भाजपसोबतची युती तोडून शिवसेनेने थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली आहे. याच दरम्यान प्रताप सरनाईकांनी राम कदमांना पेढा भरवल्यामुळे राजरीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

COMMENTS