रामाच्या नावानं किती वर्ष राजकारण करणार ?, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचा भाजपचे आमदार अतुल भातखळकरांना टोला!  VIDEO

रामाच्या नावानं किती वर्ष राजकारण करणार ?, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचा भाजपचे आमदार अतुल भातखळकरांना टोला! VIDEO

मुंबई – कोरोना काळात नवरात्रीत रामलीलाला परवानगी द्या अशी मागणी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे. यावरुन शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी भातखळकर यांना टोला लगावला आहे. रामाच्या नावानं किती वर्ष राजकारण करणार ? आजपर्यंत मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेनेच रामलीलाला परवानगी दिली. गेले अनेक वर्ष तुम्ही रामाच्या नावानेच मतं मागत आहात. रामाच्या नावाने किती वर्ष राजकारण करणार ? असा प्रश्न सरनाईक यांनी विचारला आहे.

दरम्यान फक्त राजकारण करण्यासाठी आणि मुख्यमंत्र्यांवर आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधण्यासाठी अशा प्रकारे धर्माच्या नावाखाली मागणी करत असाल तर ते चुकीचे आहे. अतुलजी तुम्हाला ही जनता कधीही माफ करणार नाही. पंतप्रधानांनी देखील कोरोना संपला नसल्याचं सांगत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. कोरोना अजून संपला नाही हे भातखळकरांना माहित नाही हे दुर्देव असल्याचेही सरनाईक म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हळूहळू सर्व गोष्टी सुरू करत आहेत. मॉल, मेट्रो चालू करतायत. सिनेमागृह काही दिवसात सुरू करतील तसेच मंदिरं आणि धार्मिक स्थळंही खुली करतील असंही ते म्हणाले आहेत.

 

COMMENTS