पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिकच्या प्रोड्यूसरला धमकी,  प्रवीण दरेकरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बायोपिकच्या प्रोड्यूसरला धमकी, प्रवीण दरेकरांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट!

मुंबई – भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणी दरेकर यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकचे प्रोड्युसर अमित वाधवाणी यांना धमक्या देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी आज वाधवाणी यांच्यासह परमवीर सिंग यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

वाधवाणी यांना अश्लिल धमक्या आल्या होत्या. त्याविरोधात चेंबूरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा विषय गंभीर आहे. त्यामुळे सदर प्रकरणात पोलीस आयुक्तांती भेट घेतली.यावेळी पोलीस आयुक्तांनी तपास जलदगतीने करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. आम्ही स्वतः लक्ष घालू असं आश्वासन परमवीर सिंग यांनी दिलं असल्याचंही प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS