प्रवीण गायकवाडांनी ‘यासाठी’ घेतली शरद पवारांची भेट ?

प्रवीण गायकवाडांनी ‘यासाठी’ घेतली शरद पवारांची भेट ?

बारामती – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आज बारामतीमध्ये पवारांच्या ‘गोविंदबाग’ या  निवासस्थानी प्रविण गायकवाड यांनी भेट घेतली. प्रवीण गायकवाड काँग्रेस पक्षाकडून पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. यावेळी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे देखील उपस्थित होते.

दरम्यान प्रविण गायकवाड यांनी ही सदिच्छा भेट घेतली असल्याचं बोललं जात आहे. परंतु प्रविण गायकवाड यांचं नाव शरद पवारांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाला सुचवलं होतं. त्याचबरोबर गायकवाड यांच्या उमेदवारीसाठी स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे देखील अनुकूल असल्याची माहिती आहे. परंतु पुण्यातील जुन्या निष्ठावंत काँग्रेस नेत्यांनी गायकवाड यांच्या नावाला विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याची माहिती आहे.

COMMENTS