राज्यात हुकूमशाहीला सुरुवात – पृथ्वीराज चव्हाण

राज्यात हुकूमशाहीला सुरुवात – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई – विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर राज्यसरकारनं विरोधकांच्या अविश्वास ठरावाला बगल देत विश्वास ठराव मांडला. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीकाक केली आहे. विधानसभेच्या कामकाजाच्या सूचित विषय नसताना मुख्यमंत्री स्वतः सभागृहात विश्‍वास ठराव मांडतात आणि कोणतीही चर्चा न करता तो संमत करून अधिवेशन गुंडाळतात त्यामुळे ही हुकमशाहीची सुरुवात नाही तर काय आहे, असा प्रश्‍न पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच राज्यासह देशात सध्या ज्या प्रकारची स्थिती आहे, ते पाहता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेत आल्यास ही या देशातील शेवटची निवडणूक ठरणार असून देश हुकूमशाहीत लोटला जाईल, असा इशाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

दरम्यान  दिल्लीत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येणा-या लोकांची अडवणूक करण्यात येत आहे असून  देशात कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून बँका बुडविणारे देश सोडून पळून जात आहेत. अशा बँकांना वाचविण्यासाठी सर्व सामान्यांच्या खात्यातील पैसे बँकेच्या भागभांडवलात कोणतीही सूचना न देता वळती करण्याचा कायदा या देशात आणण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला आहे.

COMMENTS