प्रियंका गांधी निवडणुकीच्या मैदानात, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक !

प्रियंका गांधी निवडणुकीच्या मैदानात, ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक !

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच राजकारणात सक्रिय झालेल्या काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी आता निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं दिसत आहे. याबाबतचे ट्वीट प्रियंका गांधी यांनी केलं असून वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपण तयार असल्याचं त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे प्रियंका गांधी यांचा सामना पंतप्रधान मोदी यांच्यासोबत होणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या महासचिव पदावर नियुक्ती केल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे. बनारसमध्ये काँग्रेसनं रोड शोचं आयोजन केलं होतं. यावेळीच प्रियंका यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले होते. परंतु आज अखेर त्यांनी वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. याबाबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी लवकरच निर्णय घेतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

COMMENTS