अखेर प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय, काँग्रेसच्या ‘या’ पदावर केली नियुक्ती !

अखेर प्रियांका गांधी राजकारणात सक्रीय, काँग्रेसच्या ‘या’ पदावर केली नियुक्ती !

नवी दिल्ली –  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी  प्रियांका गांधी यांची नियुक्ती पक्षाच्या महासचिव पदावर केली आहे. त्यामुळे गेली अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांकडून होणार मागणी आज अखेर पूर्ण झाली असल्याचं दिसत आहे. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाची धुरा हातात घेतल्यानंतर प्रियांका गांधी या देखील राजकारणात सक्रीय होती असा अंदाज वर्तवला जात होता. हा अंदाज अखेर खरा ठरला असून प्रियांका गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान प्रियांका गांधी या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यपासून उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी घेतील असं बोललं जात आहे. गुलाम नबी आझाद यांच्यावर सध्या उत्तर प्रदेशची जबाबदारी असून ती आता प्रियांगा गांधी यांच्यावर सोपवली जाणार आहे. तसेच  ज्योतिरादित्य शिंदे यांना उत्तर प्रदेश पश्चिमची जबाबदारी आली असून वेणुगोपाल यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी हे बदल केले असल्याचं दिसत आहे.

प्रियांका गांधी या रायबरेलीतून निवडणूक लढवणार अशी शक्यता पूर्वीपासून सुरू आहे. परंतु, आता प्रियंका गांधींना भोपाळमधून उमेदवारी देण्याची मागणी वाढत आहे. भाजपचा गड हिसकवण्यासाठी प्रियकांच्या उमेदवारीची मागणी केली जात असून भोपाळ शहरात प्रियांका गांधींचे मोठमोठे पोस्टर्स लावण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रियांका गांधींच्या राजकीय इनिंगची भोपाळमधून सुरूवात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

COMMENTS