पुण्याचे नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध !

पुण्याचे नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध !

मुंबई – पुणे शहराचं नाव बदलण्याची मागणी सध्या केली जात आहे. परंतु काँग्रेसनं याला विरोध केला असून पुण्याचे नाव बदलून इतिहास पुसू नका असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. भाजप सरकार अपयश लपविण्यासाठी शहरांची नावे बदलण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु पुण्यासारख्या शहराचे नाव बदलण्याची गरज नसल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजप सरकारन केलेल्या नाटांबदीला दोन वर्ष पूर्ण झाली असून या नोटबंदीच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेस भवनामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.  ‘नोटाबंदी’ला दोन वर्ष पूर्ण झाली. या निर्णयाने देशाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ काँग्रेस विविध शहरात निदर्शने करत असून देशाचे मोठे नुकसान करणा-या या निर्णयाविरुद्ध आपण आवाज उठवला पाहिजे.

तसेच  नोटाबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था रसातळाला गेली असून नोटाबंदीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य व्यक्तींना फटका बसला असल्याचंही चव्हाण यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांना महाआघाडीत सामील करून घेणार आहोत परंतु मनसे, एमआयएमला या आघाडीत स्थान दिलं जाणार नसल्याचंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS