पुणे – अजित पवारांचे गणेश दर्शन, दुचाकीवरुन घेतलं 20 मंडळांच्या गणपतीचं दर्शन ! VIDEO

पुणे – अजित पवारांचे गणेश दर्शन, दुचाकीवरुन घेतलं 20 मंडळांच्या गणपतीचं दर्शन ! VIDEO

पुणे – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा झंजावाती दौरा केला. एकाच दिवसात, खरंतर अवघ्या काही तासांत पुण्यातील २० मंडळांच्या गणपती दर्शनाचं लक्ष्य त्यांनी ठेवलं होतं. अशावेळी पुण्यातील वाहतूक प्रश्न तसेच रस्त्यावरील गर्दी लक्षात घेता दुचाकीशिवाय पर्याय नाही. सर्व ठिकाणी जायचं असेल तर चारचाकी एका ठिकाणी सोडणं भागच होतं. अजित पवारांनी देखील तेच केलं.

एका कार्यकर्त्याच्या मागे बसून त्यांनी अगदी गल्ली बोळातून वाट काढत गणपती दर्शन पूर्ण केलं. अजित पवारांनी झामरे चावडी ते डुल्या मारुती मंडळापर्यंतचा प्रवास दुचाकीवरून केला आहे.

COMMENTS