पुणे – भाजपचे 8 पैकी 4 आमदार डेंजर झोनमध्ये, त्यांचा पराभव होऊ शकतो, भाजपच्या सहयोगी खासदाराचा दावा !

पुणे – भाजपचे 8 पैकी 4 आमदार डेंजर झोनमध्ये, त्यांचा पराभव होऊ शकतो, भाजपच्या सहयोगी खासदाराचा दावा !

पुणे – पुण्यातील भाजपच्या आठ आमदारांपैकी चार आमदार डेंजर झोनमध्ये असून त्यांचा पराभव होऊ शकतो असा दावा भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केला आहे.  तसेच पुण्याची लोकसभा निवडणूक मीच लढवणार  असल्याची घोषणाही काकडे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी स्वतःलाच आगामी लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. तसेच पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांच्यापेक्षा आपण उजवे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपच्या आमदारांबाबत संजय काकडे यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपणच योग्य असल्याचं सांगत त्यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

 

COMMENTS