पुण्यातील भाजपच्या दोन खासदारांमध्ये प्रदीर्घ चर्चा, राजकीय समीकरणे बदलणार?

पुण्यातील भाजपच्या दोन खासदारांमध्ये प्रदीर्घ चर्चा, राजकीय समीकरणे बदलणार?

पुणे – पुण्यातील भाजपच्या दोन खासदारांमध्ये नुकतीच प्रदीर्घ चर्चा झाली आहे. या दोन्ही खासदारांमधील चर्चेमुळे पुण्यात राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. भाजपचे खासदार अनिल शिरोळे आणि संजय काकडे यांच्यामध्ये ही चर्चा झाली आहे. या दोघांमध्ये झालेल्या प्रदीर्घ चर्चेमुळे पुण्यातील आणि राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच गिरीष बापट यांनी पुढील वर्षात सरकार पडणार असल्याचं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्या या वक्तव्यावरुन संजय काकडे यांनी बापटांवर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर संजय काकडे आणि अनिल शिरोळे यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. या दोघांमध्ये झालेल्या या गुफ्तगू चर्चेमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु खर काय ते लवकरच उघड होईल.

COMMENTS