भाजपला विश्वासात घेऊ, मुख्यमंत्र्यांचं पुण्यातील बैठकीत आश्वासन!

भाजपला विश्वासात घेऊ, मुख्यमंत्र्यांचं पुण्यातील बैठकीत आश्वासन!

पुणे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुण्यातील विभागीय आयुक्तालयात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे,  राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे उपस्थित होते. यावेळी भाजप नेत्यांनी आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही” असा आक्षेप घेतला. केंद्रीय पथक आणि इतर बैठकांमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप भाजपने केला. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना विश्वासात घेण्याचे आश्वासन दिले आहे.

दरम्यान यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यात जम्बो रुग्णालय कुठे उभारले जाणार, कुठे किती प्रमाणात रुग्ण वाढत आहेत, यासंदर्भात सविस्तर माहिती घेतली. प्रत्येक वॉर्डमध्ये कोव्हिड दक्षता समिती स्थापन करावी, केंद्राकडून काही वैद्यकीय सवलत सप्टेंबरपासून बंद होणार आहे, ती पुन्हा मिळत राहावी यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच लॉकडाऊन हा पर्याय नाही, नागरिकांनी नियम पाळले पाहिजेत, सर्व महापालिका आणि वैद्यकीय पथकाची समस्या सोडवू, लक्षणे असलेल्या रुग्णांना घरी क्वारंटाईन करणं सध्या आपल्याकडे अवघड आहे. यासाठी हॉटेल उपलब्ध करुन देण्याची गरज असून आवश्यक असलेले औषध मार्गदर्शक सूचनांनुसार मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS