भोर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा, संग्राम थोपटेंनी पुणे जिल्ह्यात काँग्रेसची बूज राखली !

भोर नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा, संग्राम थोपटेंनी पुणे जिल्ह्यात काँग्रेसची बूज राखली !

भोर – भोर नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकला आहे. भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विरोधकांचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व 17 जागा जिंकल्या. तर नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकतही काँग्रेसचाच झेंडा फटकला आहे. पक्षाच्या उमेदवार निर्मला आवारे या मोठ्या मताधिक्याने निवडूण आल्या आहेत. आवारे यांना 6964 मते मिळाली. राष्ट्रवादीचा उमेदवार दुस-या क्रमांकावर राहिला. राष्ट्रवादीच्या उमेदवार शारदा डाळ यां 2996 मते मिळाली. तर भाजपचा उमेदवार तिस-या क्रमांकावर राहिला. पक्षाच्या उमेदावर दिपाली शेटे यांना 1200 मते मिळाली तर शिवसेनेच्या स्वप्नाली देशपांडे यांना अवघी 734 मते मिळाली.

ऐकेकाळी पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या काँग्रेसची गेल्या काही वर्षात धूळदान उडाली आहे. पुणे शहर आणि ग्रामिणमध्ये संग्राम थोपटे यांच्याशिवाय एकही आमदार नाही. हर्षवर्धन पाटील यांचाही गेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. ग्रामिण भागात इतर ठिकाणी काँग्रेस पक्ष औषधालाही उरला नाही. पिंपरीतून पक्ष हद्दपार झालाय. पुण्यातही पक्षाची स्थिती वाईट आहे. अशा परिस्थितीत आणि भाजपने जोरदार प्रयत्न करुनही काँग्रेसला मिळालेला हा विजय निश्चितच कौतुकास्पद आहे. नगराध्यक्षपदाचा उमेदवार मोठ्या फरकाने जिंकला आहे. त्याचबरोबर नगरसेवकही इतर वेळेच्या तुलनेपेक्षा जास्त मतांनी जिंकले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणि संग्राम थोपटे यांना हा विजय दिलासादायक आहे.

दुसरीकडे भाजपने नेहमीप्रमाणे या निवडणुकीत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. निवडणुकीच्या आधी काही दिवस थोपटे यांचे कट्टर समर्थक प्रदीप खोपडे यांना पक्षात घेतलं. नेत्यांची आणि मंत्र्यांची फौजही प्रचारात उतरवली होती. महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे तीन वेळा प्रचारासाठी भोरमध्ये आले होते. पालकमंत्री गिरीष बापट हेही दोन वेळा प्रचारासाठी आले होते. तर पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ यांनीही भोरमध्ये भाजपसाठी प्रचार केला होता. मात्र त्याचा फारसा फायदा पक्षाला झाला नाही. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्ष तिस-या क्रमांकावर फेकला गेला. एकमात्र नक्की कधाकाळी भाजपला उमेदवारही मिळत नव्हते. त्या तुलनेत पक्षाने 15 उमेदवार उभे केले. दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. आणि नगराध्यक्षाच्या उमेदवाराला 1200 मते मिळाली. शिवसेनेपेक्षा जास्त मते मिळाली एवढीचं ती भाजपच्या दृष्टीने समाधानाची बाब म्हणावी लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी दुस-या क्रमांकाची ताकद होती. ती राखण्यात त्यांना यश आलं असंल तरी नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना नेहमीपेक्षा कमी मते मिळाली ही बाब राष्ट्रवादीच्या दृष्टीने चिंतेची आहे. एकेकाळी काशिनाथ खुटवट यांच्या रुपाने राष्ट्रवादीने भोरमधून विधानसभेत विजय मिळवला होता. शिवसेनेची मात्र दयनिय अवस्था झाली. शिवेसनेचा उमेदवार थेट चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. त्यांच्या उमेदवाराला केवळ 734 मते मिळाली.

COMMENTS