पुण्याचे पालकमंत्रिपद ‘या’ नेत्याकडे जाणार?

पुण्याचे पालकमंत्रिपद ‘या’ नेत्याकडे जाणार?

पुणे – राज्यात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सहा नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर आता लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. तसेच कोणत्या जिल्ह्याचा कोणता नेता पालकमंत्री होणार याबाबतही चर्चा रंगली आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांकडे जाण्याची चर्चा सुरु झाली आहे. अजित पवारांसोबत या शर्यतीत दिलीप वळसे पाटील यांच्याही नावाची चर्चा असल्याचे बोललं जात आहे. तसेच संग्राम थोपटे आणि दत्ता भरणे यांचेही नाव पालकमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे या नेत्यांपैकी पुण्याचा पालकमंत्री कोण होणार हे पाहण गरजेचं आहे.

दरम्यान अजित पवार पुण्याचे कारभारी झाल्यावर पुन्हा एकदा पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल असा विश्वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जात होत्या. मात्र, गेल्या पंचवार्षिकला या दोन्ही महापालिकेत भाजपने एक हाती सत्ता मिळवत, राष्ट्रवादीला सुरुंग लावला. अजित पवार पालकमंत्री झाल्यास त्यांची प्रशासनावरच्या कामाची पकड पाहता येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा नक्कीच फायदा होईल असं बोललं जात आहे. त्यामुळे पुण्याचा पालकमंत्री कोण होणार हे मंत्रिमंडळ विस्तारानंतरच स्पष्ट होणार आहे.

COMMENTS