पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित, पालकमंत्री अजित पवारांनी घेतला निर्णय !

पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित, पालकमंत्री अजित पवारांनी घेतला निर्णय !

पुणे – पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रसार वाढल्यामुळे उपमुख्यमंत्री आणि
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. येत्या सोमवारपासून म्हणजे 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून पुढचे 15 दिवस लॉकडाऊन असणार आहे. अजित पवारांच्या आदेशानुसार संपूर्ण पुणे जिल्ह्यात यामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा परिसरातही पुन्हा लाॅकडाऊन करण्यात येणार आहे.पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळीत अजित पवारांनी लाॅकडाऊनचा निर्णय घेतला.

दरम्यान नागरिकांना काही वस्तूंची किंवा अत्यावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी वेळ देणं आवश्यक असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी उपमुख्यमंत्र्यांना बैठकीत दिवी. त्यानुसार अजित पवार यांनी लॉकडाऊन कधी लागू करायचा याचा निर्णय दोन्ही महापालिकांच्या आयुक्तांवर सोपवला आहे. त्यामुळे लॉकडाऊन सोमवारी लागू करायचा की मंगळवारी पासून लागू करायचा याचा निर्णय मनपा आयुक्त घेणार आहेत.

COMMENTS