पुण्यात गिरीश बापट, खा. अनिल शिरोळेंना धक्का, लोकसभेसाठी नवीन चेह-याची चाचपणी ?

पुण्यात गिरीश बापट, खा. अनिल शिरोळेंना धक्का, लोकसभेसाठी नवीन चेह-याची चाचपणी ?

पुणे –  आगाम लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यात भाजपकडून नवीन उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांना मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. पुण्याच्या लोकसभा जागेसाठी भाजपकडून तरुण उमेदवारांची चाचपणी सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः नवीन चेहऱ्यांबाबत चाचपणी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरली मोहोळ आणि आमदार योगेश मुळीक यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे.

दरम्यान गिरीश बापट आणि अनिल शिरोळ यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण मागील लोकसभा निवडणुकीत या दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीत तिकीटासाठी रस्सीखेच झाल्याची चर्चा होती. परंतु आता या दोन्ही नेत्यांना डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिस-या चेह-याच्या शोधात असल्याची माहिती आहे.त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून कोणाला संधी मिळणार याबाबतची उत्सुकता राजकीय वर्तुळात पहायला मिळत आहे.

COMMENTS